क्षेत्रातील शेतकरी बांधवांनी मानले आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम हलबीटोला (सावरी) ते सावरी दरम्यान असलेल्या ग्रामीण मार्गावरील ( ग्रा. मा. ३८१ ) जीर्ण असलेल्या कॅनल क्रॉसिंग वरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. एकूण ३ कोटी २० लक्ष रुपयांच्या निधीतून पुलाचे बांधकाम होणार असून तब्बल २० वर्षापासून असलेल्या जीर्ण पुलाच्या पुनर्निर्माणामुळे क्षेत्रातील नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित पुलाच्या बांधकामाचा विषय निकाली काढल्याबद्दल क्षेत्रातील नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत.
ग्राम हलबीटोला (सावरी) ते सावरी दरम्यान असलेल्या ग्रामीण मार्गावरील ( ग्रा. मा. ३८१ ) जीर्ण असलेल्या कॅनल क्रॉसिंग वरील जीर्ण पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे यासाठी नागरिकांनी तत्कालीन आमदारांकडे धाव घेतली असता त्यानं उडवा उडवी ची उत्तरे मिळत होती. नागरिक जीर्ण पुलाचा वापर जीव मुठीत घेऊन करीत होते. अखेर या पुलाच्या बांधकामाचा मुहूर्त निघायला आमदार विनोद अग्रवालांना आमदार व्हावे लागले आणि आमदार होताच गावातील नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कडे धाव घेताच आमदारांनी विशेष लक्ष देऊन पुलासाठी ३ कोटी २० लक्ष रुपये मंजूर करुन घेतले.
दरम्यान उमा तुरकर, भरतलाल टेंभरे, हुसनलाल ठाकरे, ओमप्रकाश अग्रवाल, जानकी प्रसाद बिसेन, भुवनसिंह रहांगडाले, योगराज बिसेन, टिटुलाल लील्हारे, लक्षण चौधरी, सोमा तुरकर, यादोराव बिसेन, ईश्वर पटले, कौशल नाईक, योगेंद्र हरीणखेडे, शोभेलाल पटले, तानुभाऊ बिसेन, प्रेमचंद बिसेन, शिवा हरीणखेडे, मुकेश नागपुरे, महेंद्र चीखलोंढे, महेश पगरवार, राधेश्याम गजभिये, लक्ष्मीकांत चीखलोंढे, नरेंद्र चिखलोंढे, टेकचंद शिहोरे, सूरज चीखलोंढे, शिवा दमाहे, मुन्ना चीखलोंढे, राजकुमार बिसेन, डोलचंद मेश्राम, पुरूषकुमार मेश्राम, शर्वेश्वर मेश्राम, चूनेश्वर पटले, भुमेश बिसेन, कमल लिल्हारे, संतोष पटले, सुरेश लिल्हारे, जयचंद लील्हारे, चैनलाल कटरे,जग्गू महाजन, कुलपत उके, योगेश तुरकर, जिवेंद्र पटले, लालचंद रहांगडाले, गिरिधारी तुरकर तसेच क्षेत्रातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.