ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी टेनिस प्रणव कोरडे आणि त्याच्या संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

0
2

संभाजीनगर,दि.05- प्रणव कोरडे आणि त्याचे सहकार्याने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये विजयवाडा येथील के एल विद्यापीठ आंध्रप्रदेशतर्फे खेळताना लॉन टेनिस पटूंच्या कामगिरीवर सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे त्यांचा संघ आता अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये पहिल्या चार संघांमध्ये पोहोचला आहे.त्यांच्या संघाला जागतिक विद्यापीठ स्पर्धेमध्ये पात्रता फेरीसाठी या संघातील खेळाडूंची निवड झाली असून जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. तसेच यांचा अंतिम चार संघांमध्ये समावेश झाल्यामुळे त्यांनी आपले पदक निश्चित केले आहे.

स्पर्धेमध्ये कोनेरू लक्ष्मीया एज्युकेशन फाउंडेशन म्हणजे विजयवाडा येथील के एल विद्यापीठ आंध्र प्रदेश यांनी
कुरुक्षेत्र विद्यापीठ संघाला 3/2 असे पराभूत करून क्वाटर फायनलमध्ये प्रवेश केला.तसेच क्वाटर फायनलमध्ये M.G.काशी विद्यापीठ संघाला 3/1 असे पराभूत करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.स्पर्धेमध्ये KLEF, विजयवाडा विद्यापीठाच्यावतीने तीर्थ शशांक, प्रणव कोरडे ,आदित्य वर्धन, नईशिक रेड्डी , सूर्य आकाश यांनी आपली उत्तुंग कामगिरी करीत उपांत्य फेरीत प्रवेश करून अखिल भारतीयस्तरावर वेगळी छाप निर्माण केली आहे.त्यांचे सर्वच स्तरामधून कौतुक होत आहे.
जयपूर यथे आयोजित ऑल इंडिया आंतरविद्यापीठ टेनिस स्पर्धेमध्ये भारतामधील १६ विद्यापीठाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला.यात (औरंगाबादच्या) छत्रपती संभाजीनगरचा प्रणव कोरडे याने केएल विद्यापीठ,विजयवाडा,आंध्रप्रदेश तर्फे खेळून सहकार्याबरोबर चमकदार कामगिरी करून विजय नोंदवला .
प्रणव कोरडे एमएसएलटीए छत्रपती संभाजीनगरचा खेळाडू आहे.प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.या यशाबद्दल इंडोरन्स कंपनीच्या वर्षा जैन,ॲड श्रीकांत अद्वंत,भगवानदास ग्रुप कंपनी आदींनी त्याचे अभिनंदन केले.