दिग्रस : भंडारा येथील आमदार नरेंद्र बोंडेकर हे दिग्रस येथे आले होते. दिग्रस येथून काम आटोपून गावी जातांना त्यांच्या ताफ्यातील पोलीस स्कॉड वाहनाची व समोरून येणाऱ्या ऑटोत व दुचाकीत जोरदार धडक झाल्याची घटना आज दि.५ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, भंडाराचे आमदार नरेंद्र बोंडेकर हे दिग्रस येथील एका कार्यक्रमाकरिता आले होते. कार्यक्रम आटोपून ते परत गावी जात असतांना त्यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन क्रं एम.एच.३६ – २२७२ व समोरून येणारा ऑटो क्रं.एम.एच.२९ डब्लू ९०७५ व दुचाकी क्रं.एम.एच.३७ वाय.६५६४ यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकी वरील गजानन जकाते (वय -५०) रा.दिग्रस, उमेश राजू मनवर (वय-३०) रा.चिंचोली क्रं.२ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले असून ऑटो मधील सै.जावेद सै. ताजुद्दीन (वय-३८), सलमा परवीन (वय-२४), अफसाना बी. मो.जमीर (वय-६०), प्रतिक ब्रम्हा मोरे (वय-२०), सुरेखा गजानन बोरकर (वय-३०), अनस खान वाजीद खान (वय-१२), तोहीद खान वाजीद खान (वय-८) सर्व रा.मोतीनगर, दिग्रस जखमी असून त्यांचेवर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.