तलाठी भरती निवड प्रकियेत प्रलोभनाला बळी पडू नये-जिल्हाधिकारी गोतमारेे

0
177

गोंदिया,दि.05- महाराष्ट्र महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेली तलाठी भरती परीक्षा ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पार पडली. आता परीक्षा दिलेले उमेदवार महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ च्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.राज्यस्तरावरुन या परिक्षेचा निकाल अद्यापही लागलेला नसून निवड यादी सुद्दा प्रकाशित झालेली नाही,त्यामुळे कुठल्याही परिक्षार्थी उमेदवारांने नौकरी लावून देण्याचे प्रलोभन देणार्या एजंटाला बळी पडू नये असे आवाहन गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.तसेच कुुणी यांसदर्भात नौकरी लावूून देण्याचे प्रलोभन देत असल्यास जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

गोंदिया जिल्हा महसूल विभागातर्गत (Talathi) तलाठी पदाच्या ६० जागांकरीता परिक्षा टीसीएस कंपनीमार्फेत घेण्यात आली.यात 9330 परिक्षार्थी सहभागी झाले होते.ही परिक्षा टीसीएस कंपनीतर्फे राज्यस्तरावर घेण्यात आली असून परिक्षेचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही.मात्र विदर्भात तलाठी भरतीच्या नावावर परिक्षार्थी उमेदवारांना नौकरी लावून देण्याच्या नावावर काही एजंटानी फिरणे सुरु केल्याच्या चर्चेमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.तलाठी भरतीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना जोपर्यंत निकाल लागत नाही व निवड यादी प्रकाशित होत नाही,तोपर्यंत अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता जनतेने सावध राहावे असे आवाहन जिल्हाप्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.km