भंडारा-जिल्हा मध्यवर्ती बँकेने खातेधारकांच्या सुविधेकरिता बँकेच्या वतीने सर्व शाखांमध्ये एटीएम सेवा सुरू करण्यात येणार असून या सुविधेचा खातेधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने बचत खाते धारकांकरिता रूपे एटीएम डेबीट कार्ड ही सुविधा सुरू केली आहे.
जिल्ह्यातील सर्व खातेधारकांना या सेवेचा लाभ होणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत खाते उघडणार्या सर्व खातेधारकांनासुध्दा या सेवेचा लाभ दिला जाणार आहे. याकरिता त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. ही सेवा ग्राहकांकरिता निःशुल्क राहणार आहे. तसेच जिल्ह्यात जानेवारी २०१५ पर्यंत ही सेवा प्रदान करण्यात येणार असल्याचे फुंडे यांनी सांगितले. बँकेने शेतकर्यांकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्याचे ठरविले आहे. दुसर्या टप्प्यात ही योजना कार्यान्वीत होणार आहे. एप्रिल महिन्यात मायक्रो एटीएम सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील दूर्गम व अतिदूर्गम भागातील जनतेला बँकेचे आर्थिक व्यवहार करण्याकरीता शाखेपर्यंत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. बँकमित्र स्वतः खातेधारकांपर्यंत पोहचणार असल्याचे फुंडे यांनी सांगितले.
खातेधारकांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा-सुनील फुंडे
वाढदिवसाच्या शुभेच्छा