अबब..! चक्क बनावट नोटा तयार; दोघे ताब्यात

0
296
वाढदिवसाच्या शुभेच्छा

परभणी,दि.१६ः भारतीय चलनातील बनावट नोटा बनविण्याच्या साहित्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित दोघेजण स्टेशन रोड शाही मस्जिद जवळ किरायाच्या खोलीमध्ये राहत होते. आरोपींजवळून भारतीय चलनातील बनावट नोटा, प्रिंटर, नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य (Literature) असा एकूण १५ हजार ७४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई(action) शनिवार १५ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान करण्यात आली.

सदर घटनेविषयी अधिक माहिती अशी की, नवा मोंढा पोलीसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याजवळ लॅपटॉप, मोबाईल होता. लॅपटॉपमध्ये (Laptop)भारतीय चलनातील २०० रुपये किंमतीचे फोटो, नकली नोटा(fake note) कशा बनवायच्या याबाबत व्हिडीओ होते. पोलीसांनी संबंधित दोघांना नानलपेठ पोलीसांच्या स्वाधीन (independent) केले. त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी करत ते राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले. या ठिकाणची तपासणी केली असता. तेथे नोटा तयार करण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर(bond Paper), शाही(Ink), प्रिंटर, काही बनावट नोटा असे साहित्य मिळून आले. संबंधित दोघेजण भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करत होते.

या प्रकरणात पोउपनि. गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ गणी प्रकाश पांढरे, शेख अदनान शेख नयुम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. चितांबर कामठेवाड, सपोनि. सोमनाथ शिंदे, पोउपनि. गणेश पवार, पोलीस अंमलदार सुधाकर कुटे, संतोष सानप, सुशे, काळे यांच्या पथकाने केली.