निवडणूकविषयक विविध कक्षांना,जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट

0
10
परभणी, दि.11 – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकीशी संबंधित विविध कक्षांना भेट देऊन कामाकाजाची पाहणी केली.
श्री. गावडे यांनी निवडणूक साहित्य कक्षाची पाहणी करताना साहित्य वाटपाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. सर्व साहित्य वेळेत संबंधित स्थळी पोहोचविण्याची दक्षता घेण्यास सांगितले. टपाल मतपत्रिका, आचारसंहिता कक्षाचीही त्यांनी पाहणी केली.
त्यानंतर प्रसार माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कक्षामध्ये सुरु असलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांच्या कामाकाजाचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकुळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब तहसिलदार सतीश रेड्डी आदी उपस्थित होते.