मायक्रोमॅक्स कॅनव्हास ‘एक्स्प्रेस ए९९’

0
17

मायक्रोमॅक्सचा कॅन्व्हास ‘एक्स्प्रेस ए९९’ हा स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे. ६,९९९ रुपयांना हा फोन उपलब्ध करण्यात आला असून, फ्लिपकार्टवर फोनची ऑनलाईन बुकींग सुरू आहे. या फोनचे खास वैशिष्टये म्हणजे यामध्ये एमएफसीचे मीडियाटेक व्हर्जन असल्याने एकावेळी दोन व्यक्ती आपल्या फोनवरून एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. तसेच गेम्ससोबत डाटा एक्सचेंज करू शकतात. या शिवाय यामध्ये गेश्चर लॉकचे ऑप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे वेगवेगळे ऍप्लीकेशन ओपन करण्यासाठी स्क्रीनमध्ये वेगवेगळे गेश्चर लॉक सेट करता येणार आहेत. या फोनचा ‘एयरसेल’सोबत करार झाला आहे. त्यामुळे युजरला सहा महिन्यांसाठी ६०० एमबीचा इंटरनेट डाटा मोफत मिळणार आहे. वैशिष्टये : १.३ गीगाहर्टज क्वॉडकोर मीडिया टेक प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी रोम, ३२ जीबी एक्पांडेबल मेमरी, ४.५ इंचची स्क्रीन, ऍण्ड्रॉईड किटकॅट ४.४.२ ओएस व्हर्जन, ५ मेगापिक्सल रियर आणि ०.२ प्रंट कॅमेरा, थ्रीजी, वाय फाय, ब्ल्यूटूथ०.१९५० एमएएच बॅटरी