राज्य सरकारकडून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा

0
7

नागपुर -राज्य सरकारकडून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली. दहीहंडी खेळादरम्यान होणार्‍या अपघातांच्या वाढत्या घटनांमूळे बालगोविंदांना दहीहंडी उत्सवात बंदी घालण्यात आली होती. तसेच बाल हक्क अभियानाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने दहीहंडी खेळासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्वे घालून दिली होती. त्यामुळे या खेळावर मर्यादा आल्या होत्या. मात्र, राज्य सरकारडून दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्याने खेळाच्या मार्गातील नियमांचे अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे दहीहंडी उत्सव मंडळांकडून स्वागत करण्यात आले आहे.