नांदेड,दि.26 -गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .उत्तम बाबळे,सखाराम राठोड, पंडित राठोड, विष्णू जाधव यांचे हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक दिलीप वाघमारे यांनी केले.प्रास्ताविक भाषणात म्हणाले,आपल्या महापुरुषांचे जन्मदिन, स्मृतिदिन तसेच संविधान दिनासारखे विशेष दिवशी सर्व बांधवांनी गावस्तरावर एकत्र येवून साजरे करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
उत्तम बाबळे म्हणाले, भारतीय संविधानाचा इतिहास समजावून सांगताना त्यातील बाबासाहेबांचे योगदान स्पष्ट केले. या संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा स्वीकार केल्याने दर्जाची व संधीची समानता निर्माण केली आहे. सर्व भारतीयांना या संविधानाच्या रूपाने एक स्वतंत्र जीवन जगण्याची संधी मिळाली. तसेच स्वतःची प्रगती साधण्याची संधी मिळाली. ज्या व्यवस्थेने हजारो वर्षे बहुजन समाजालाच नव्हे तर मूलनिवासी राजे- रजवाड्यांनाही गुलाम बनवले होते त्या समाजाला स्वातंत्र्याची नवसंजीवनी मिळाली.कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी चांदणी जाधव,गब्बरसिंग आडे, ओमकार राठोड यांनी केले.आभार उपस्थित सर्वांचे दिलीप वाघमारे यांनी मानले.