अर्जुनी मोर.-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी शेत शिवारातील रमणलाल राणीदान चांडक यांचे शेतातील दोन धानाचे पूजने अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीत जळून खाक झाले असून सदर शेतकऱ्यांचे साडेतीन लाख रुपये चे नुकसान झाल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी पहाटे अंदाजे दोन वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव येथील व्यवसायिक रमणलाल राणीदान चांडक यांची बाराभाटी येथे गट क्रं. ५५३ क्षेत्र ३.७१ हेक्टर आर,गट क्रं. 579 छेत्र 0. 40 हेक्टर आर ,गट क्रमांक 649 क्षेत्र 0. 20 हेक्टर आर वर्णनाची शेती आहे. सदर शेती ठेका पद्धतीने बाराभाटी येथील किशोर बेलखोडे, महेश बेलखोडे, व भोजराज बेलखोडे हे बंधू सदर शेती करतात. यावर्षी खरीप हंगामाची फसल बऱ्यापैकी आहे. धनाची कापणी करून त्यांनी मळणीसाठी शेतातील बांधावरच पूजने करून ठेवले होते. मात्र 26 नोव्हेंबर च्या पहाटे काही अज्ञात इस्मानी दोन्ही पूजन्यांना आग लावल्याने दोन्ही पूजने जळून खाक झाले आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. तलाठी सुनील राठोड यांनी मोका चौकशी करून पंचनामा केला आहे. सदर शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामवासी यांनी केली आहे.