छत्रपती संभाजीनगरच्या प्रणव कोरडेची सुवर्णपदकासाठी लढत शानदार कामगिरी

0
45

अखिल भारतीय विद्यापीठ टेनिस स्पर्धेमध्ये प्रणव कोरडीची चमकदार कामगिरी

छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगरचा स्टार टेनिसपटू प्रणव कोरडे याची अखिल भारतीय विद्यापीठ टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या बळावर आपल्या संघाला अंतिम फेरी पोहोचवले. आणि आपली गोल्ड मेडल वर दावेदारी सिद्ध करण्यासाठी उद्या त्याचा अंतिम सामना जयपूर येथे सामना मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूर येथे होणार आहे. या स्पर्धेतील विजेता गोल्ड मेडल तर उपविजेत्यांना सिल्वर मेडल मिळणार आहे. ही भारतातील युनिव्हर्सिटी गेम मधील सर्वोच्च स्पर्धा आहे. प्रणवच्या युनिव्हर्सिटीने प्रथम राऊंड मध्ये नंबर वन सीड असलेली नॉर्थ झोन मधील टीम महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी यांना सरळ तीन मॅचेस मध्ये पराभव करून कॉटर फायनल/उपांत्यपूर्व मध्ये प्रवेश केला. आणि कॉटर फायनल/उपांत्यपूर्व मध्ये आय टी एम यूनिवर्सिटी चा सरळ सेट मध्ये पराभव करून सेमी फायनल गाठली. आणि सेमी फायनल मध्ये त्यांची गाठ मणिपूर युनिव्हर्सिटी यांच्याबरोबर झाली आणि या सेमी फायनल मध्ये अत्यंत चुरशीच्या अशा सामन्यात प्रणव कोरडेने सिंगल टॉप सीडेड प्लेयर भूषण याचा सरळ सलग शेठ मध्ये ६-४,६-३ असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात विकी सेकंड सीडेड प्लेयर याचा ४-६,७-५,६-४ मधील दोन्ही सामने जिंकून तसेच आपला साथीदार तीर्थ शशांक याच्याबरोबर दुहेरीचा सामना ही खेळून त्या सामन्यातही सलग शेठ मध्ये ६-१,६ -१ विजय प्राप्त करूनअंतिम फेरी प्रवेश मिळवून दिला. तसेच त्याने दुहेरीच्या सामन्यातही विजय मिळवला प्रणवची कामगिरी पुरुषांच्या राष्ट्रीय लेव्हल वरील अतिशय उच्च दर्जाची होती. त्याने मोठ्या मानांकित खेळाडूंचा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या मराठवाड्याचे तसेच छत्रपती संभाजी नगरचे नाव लौकिक केला आहे. आणि आपल्या युनिव्हर्सिटी ला अभिमान बाळगावा अशी कामगिरी केलेली आहे. आता त्यांचा अंतिम सामना हा भारतातील पूर्व विभागातील टीम कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्याबरोबर होणार आहे. हे राष्ट्रीय लेव्हलचे सामने मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूर येथे खेळवले जात आहेत.

ऑल इंडिया विद्यापीठ टेनिस (पुरुष) या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून भारतातील एकूण चार जून मधून एकूण 16 विद्यापीठ ची निवड झाली होती.विभागातून छत्रपती संभाजी नगरचा प्रणव कोरडे हा कोनेरू लक्ष्मय्या एज्युकेशन फाउंडेशन विद्यापीठचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रणव कोरडे याने अतिशय उच्च दर्जाची कामगिरी करून आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचवले. तसेच त्याने आपल्या संघाला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेमसाठी पात्र ठरवले.या स्पर्धेमध्ये प्रणव कोरडे यांनी अतिशय दर्जेदार कामगिरी नोंदवली. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि विशेष म्हणजे एका दिवसात सलग सहा तास तीन सामने खेळून स्वतःचा स्टॅमिना त्याने सिद्ध केला आहे. तसेच त्याने आजचे सर्व सामने सरळ सेट मध्ये जिंकले आहेत आणि आपल्या खेळातील कौशल्य दाखवले आहे.

प्रणव कोरडे हा एक होतकरू व्यावसायिक टेनिसपटू आहे. तसेच तो आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी देखील करत आहे व त्याला भरघोस पाठींबा मिळत असून मुंबई येथील सुप्रसिद्ध उद्योजक हिराभाई दोषी यांनी प्रणवचे विशेष कौतुक केले आहे. प्रणव कोरडे हा एक प्रतिभावान खेळाडू आहे याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या प्रणव कोरडे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या हेतूने बंगळुरू येथील पीबीआय टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे.

या कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अॅड. श्रीकांत अदवंत साहेब, अॅड, अजय तल्हार साहेब डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, अहिल्यानगरचे संघ कार्यवाहक लव शिवशंकर शिंदे, शंकरशेठ नळकांडे (नेवासा), रावसाहेब नाथाजी मस्के माजी चेअरमन बाबळेश्वर दूध संघ यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.