खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी संवेदना व्यक्त केल्या
गोंदिया:- भंडारा कडून साकोली मार्गे गोंदिया कडे जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात गोंदिया जिल्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ झाला. शिवशाही बस क्र.०९ Em १२७३ असा आहे. बस मध्ये अंदाजे ४० प्रवाशी होते, अपघाता दरम्यान नागरिकांची गर्दी जमा झाली, नागरिकांनी सहकार्य करून बचाव कार्य सुरूच ठेवले. या अपघातात अंदाजे 11 प्रवाशी मरण पावले असे सांगीतल्या गेले. तर काही जखमी असल्याचे सांगितले. मला माहिती मिळताच गोंदिया येथील जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, पोलिस अधिक्षक, आगार प्रमुखाशी संपर्क केला, आणि तात्काळ त्यांच्यावर योग्य तो उपचार करा, असे खा.पडोळे यांनी संबंधित अधिकारी यांना सांगितले. पण अपघात खूप मोठा असल्यामुळे त्यात तेथील डॉक्टर यांना जखमी प्रवाश्यांना वाचविण्यासाठी यश आले नाही. तर काहींचा मृत्यू तर घटनास्थळी झाला होता. कार्यकर्त्यांची खूप धावाधाव होती. बचाव कार्य सुरूच होते. अशातच अंदाजे 11 प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला अशी माहिती मिळाली तर काही जखमी आहेत. सदर घटनेमध्ये मृत पावलेल्या आणि जखमी कुटुंबियांच्या मी सोबत आहो.
आपल्या संवेदना व्यक्त करतो.
ही अत्यंत दुःखद घटना आहे. तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र व राज्य शासनाने मृत कुटुंबियांना २५ लाख रुपये जाहीर करावे तर जखमी कुटूंबांना १५ लाख रुपये शासनाने तात्काळ जाहीर करावे.
सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी-डव्वा-पळसगाव रोडवर बस पलटली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी संवेदना व्यक्त केल्या. मी आपल्या दुःखात सहभागी आहो असेही यावेळी खा.पडोळे यांनी सांगितले.