धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, अजितदादांसमोरच गावकऱ्यांची प्रचंड घोषणाबाजी

0
84

बीड-काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आजच देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे.

यावेळी बोलताना एका ग्रामस्थानं म्हटलं की, ‘माझं म्हणण असं आहे की आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृहखातं आहे. चांगलं म्हणून त्यांचं नाव आहे, देशभरात महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचा दबदबा आहे. मात्र तेरा दिवस झाले तरी यांना तीन आरोपी सापडत नाहीत, याचा अर्थ काय? असा सवाल या ग्रामस्थाने उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी तुम्हाला शब्द देतो या प्रकरणातील मास्टर मांइड सुटणार नाही.