डव्वा येथील धम्मकुटीवर ‘प्रबोधनातून समाज परिवर्तन सोहळ्याचे’ आयोजन

0
48

*सडक अर्जुनी :* डव्वा येथील सम्यक संकल्प धम्मकुटीवर 24 व 25 डिसेंबर ला दोन दिवशीय ‘प्रबोधनातून समाज परिवर्तन सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
दि.24 डिसेंबर ला सकाळी 5 वाजता वंदना पूजा व मंगलमैत्री, सकाळी 9 वाजता वडेगाव चे किराणा दुकानदार श्री बडोले यांचे हस्ते धम्मध्वजारोहण , सकाळी 9.30 वाजता भदंत संघधातू यांच्याद्वारे धम्मध्वज वंदना व शिलग्रहण करण्यात येणार आहे.
सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव (समूह नृत्य )’ आदर्श आपल्या महापुरुषांचा ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी मंत्री तथा आमदार इंजी. राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सालेकसा येथील प्राध्यापक पूर्ती महाविद्यालयाचे संस्थापक राजेंद्र बडोले राहणार आहेत. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून नागपूरचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे, भंडाराचे माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, सामाजिक कार्यकर्ते शुद्धोधन शहारे, विश्वजीत डोंगरे, जुगनू रंगारी, विदेश टेंभूर्णे, सुखदास मेश्राम, चंद्रकांता मेश्राम, अभिजित रामटेके, पिंटू गजभिये आदी उपस्थित राहणार आहेत.
25 डिसेंबर ला सकाळी 6 वाजता मंगलमैत्री, अल्पोपहार व संघदान, सकाळी 9 वाजता दीक्षितांना धम्मदीक्षा विधी समारोह कार्यक्रम आणि दुपारी 12 वाजता मनुस्मृती दहन कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते श्री बघेले, श्री कावळे उपस्थित पार पडणार आहे.
दुपारी 3 वाजता ‘ बा भीमा
तुझ्यामुळे ‘हा प्रबोधनात्मक कार्यक्रम बल्लारशा येथील आदेशभाऊ व संच सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन भंडाराचे डी. वाय. एस. पी. श्री इलमकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बन्सोड राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवोदय विद्यालयाचे प्रोफेसर एम. आर. बलवीर, गोंदियाचे संजयदादा गणवीर, नागपूरचे कामगार अधिकारी कृष्णा दुबे, नागपूरचे बी.डी.ओ. सत्येन्द्र तामगाडगे, नवोदय विद्यालयाच्या बलवीर म्याडम, गोंदियाच्या शिक्षिका मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजभिये, गजभिये म्याडम व गोंदियाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. मोहीतकुमार गजभिये आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर दोन दिवशीय कार्यक्रमाला भिक्खु संघ व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक, सम्यक संकल्प बुद्धिस्ट समिती डव्वा/ पळसगावच्या वतीने करण्यात आले आहे.