छत्रपती संभाजीनगर,दि.3– काही महीन्यात महानगरपालिकेची निवडणुकीची शक्यता असताना उबठात असलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले व अनिताताई घोडेले यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना(उबाठाचे) नेते चंद्रकांत खैरे यांचेही ते अत्यंत विश्वासू होते. घोडेले यांनी समाजकल्याण मंत्री संजय सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हि जिहिर प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.