धाराशिव दि.५– रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिवच्या वतीने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे.राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी वाहनास रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” चे बॅनर लावून त्यास हिरवा झेंडा दाखवून रस्ता सुरक्षा अभियानास सुरुवात केली.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी व कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक,सहायक. मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी व कार्यालयात आलेले सर्व नागरीक, वाहन चालक / मालक,मोटार ड्रायव्हिंगस्कूलचे संचालक व वाहन वितरकांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
*ब्रेकटेस्ट ट्रॅक
१ जानेवारी रोजी ब्रेकटेस्ट ट्रॅक या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व वाहनमालक व इतर नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” चे अंतर्गत मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय पांडकर यांनी रस्त्यावर चालणाऱ्या दुचाकीधारकाने हेलमेट परिधान करावे व चारचाकी वाहनधारकांनी सिटबेल्टचा वापर करावा.ज्या ठिकाणी अपघातास व्यक्ती बळी पडतात अशा ठिकाणी नागरीकांनी अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ अँम्बुलंस बोलावून हॉस्पीटलला पाठविण्यासाठी मदत करावी.तसेच रस्त्यावर वाहन चालकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये,याबाबत उपस्थित असलेल्या नागरीकांना सुचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.