सामाजिक ध्येयातून अनेकांनी केले रक्तदान

0
26

#नरेंद्राचार्य महाराज संस्था नानिज धाम स्व स्वरूप संप्रदाय आमगाव यांच्या द्वारे आयोजित रक्तदान शिबिर.

आमगाव:-जगत गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थान वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी रक्तदान शिविर उद्घाटन प्रसंगी समाजसेवी यशवंत मानकर , संस्थान चे तालुका समन्वयक राजेंद्र भांडारकर, कैलाश तिवारी, घनश्याम अग्रवाल,उत्तम नंदेश्वर,महिला प्रमुख मयाताई शेंडे, डिकेश कावळे,रक्तदान शिबिर प्रमुख संगीता भांडारकर, मार्गदर्शक गुरूचंद रहांगडाले, किसनलालजी बोपचे, हर्ष भांडारकर, महेश कावळे,दीपक कोसरकर, हिमांशू भांडारकर, सिद्धार्थ हेमने,शालिनी भांडारकर, हेमलता ताई पागोटे, हिरताई सोनकनवरे, प्रल्हाद भांडारकर रेवारामजी पारधी रक्तपेटी चे अरुण मोरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमचे प्रारंभ करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितांना समाजसेवी यशवंत मानकर यांनी अनंत श्री विभूषित जगत गुरू रामानंदचार्य व नरेंद्राचार्य महाराज संस्था नानिज धाम स्व स्वरूप संप्रदाय आमगाव यांच्या द्वारे आयोजित रक्तदान शिबिर माध्यमाने समाज कार्यात अतुलनीय योगदान आज आरोग्य सेवेत मिळत आहे.संस्थानच्यां वतीने राज्यसह संपूर्ण देशात विविध सेवाकार्यातून कार्य केले जात आहे.हे विविध समाज कार्य समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोलाचे आहे, या कार्यात प्रत्येक नागरिकांनी आपले सहकार्य व योगदान दिले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळी बाजार समिती संचालक महेश उके, संजय बहेकार, अनेक मान्यवरांनी हजेरी लावली व रक्तदात्यांचे प्रोत्साहन देत त्यांचे रक्तदान केल्याबद्दल अभिनंदन केले.

#प्रत्येक सेलिब्रेशन करा पण त्यातून समाजाला मिळेल ते द्या:- अंसुल कटकवार
नरेंद्राचार्य महाराज संस्था नानिज धाम स्व स्वरूप संप्रदाय आमगाव यांच्या द्वारे आयोजित रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात मी सहभागी झालो मला आनंद आहे,आज साजघटकाला अनेक बाबींची आवश्यकता आहे. आज मी आपल्या बाबांच्या वाढदिवस साजरा करीत आहे, हे सेलिब्रेशन करताना समाजाला मिळेल असे काही देण्याची गरज असल्याचे वाटले यातूनच मी रक्तदान करीत आहे.प्रत्येक नागरिकांनी आपले सहकार्य समाजाला करावे. विविध उत्सव पार्टी आयोजित करताना समाजाला आवश्यक असलेल्या गरजा यातून पूर्ण होतील असे योगदान प्रत्येकाने करावे.असे मत त्यांनी याप्रंगी वेक्त करीत अनेकांना प्रेरणा दिली.