वसमत : वसमत येथील तहसील कार्यालय व पूर्णा पाटबंधारे कार्यालय परिसरातील टपऱ्या व इतर अतिक्रमण काढण्याची मोहीम गुरुवारी राबवण्यात आली तहसीलदार शारदा दळवी यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली कार्यकारी अभियंता बिराजदार यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर ही कारवाई केली असल्याचे समोर येत आहे.
वसमत तहसील कार्यालय (Vasmat Tehsil) परिसरात चहाच्या टपऱ्या व किरकोळ विक्रेत्यांचे टपऱ्यासह इतर अतिक्रमण करण्यात आले होते येथे दिवसभर गर्दी जमत होती बुधवारी कार्यकारी अभियंता बिराजदार यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर पूर्णाप्रकल्प पाटबंधारे विभागाच्या परिसरातील व तहसील कार्यालय परिसरातील सर्व अतिक्रमण हटवण्यात आले. तहसीलदार शारदा दळवी यांच्या उपस्थितीत तहसील परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली या मोहिमेत महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी , पूर्णापाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होतेमारहाण झाल्याच्या घटनेनंतर (Vasmat Tehsil) तहसील कार्यालय परिसरात गर्दी जमू नये या हेतूने ही मोहीम राबवण्यात आल्याचे समोर येत आहे.