10 वर्षांपूर्वी बांधलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात

0
45

औंढा नागनाथ  : तालुक्यातील सिध्देश्वर येथे दहा वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आरोग्य अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे धुळखात पडून आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे कोट्यावधीची (Health center) इमारत व वैद्यकीय साहित्य अस्ताव्यस्त पडले असून जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे दहा वर्षांपूर्वी (Health center) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्या अभावी सदर प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड काळ वगळता आतापर्यंत बंद अवस्थेत आहे त्यामुळे परिसरातील 40 गावांच्या नागरिकांची आरोग्यवस्थेबाबत कुचंबना होत असून छोट्या छोट्या आजारासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांच्या वेळ व पैसा वाया जात आहे कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेली इमारत केवळ जिल्हा प्रशासनाच्या व (Health center) आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे धुळखात पडली असून लाखो रुपयांचे वैद्यकीय साहित्य व औषधी कालबाह्य झालेली आहे दिसून येत आहे तसेच रुग्णांसाठी असलेले बेड व इतर साहित्याची दुरावस्था झाली आहे