नांदेड/दि०१–गोंडजेवली येथील लक्ष्मण ( पिंटू) जाधव (ग्रामपंचायत सदस्य) यांच्या चिरंजीव रुद्राक्ष लक्ष्मण उर्फ पिंटू जाधव यांचा द्वितीय वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा गोंडजेवली व गोंडजेवली तांडा शाळेमध्ये शालेय साहित्य व खाऊ विद्यार्थ्यांना देऊन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. रुद्राक्षयांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला .
सर्व शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक,शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी गोंडजेवली येथे राजेश बुरावाड व बस्वराज आचारे, यांनी त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.
सहशिक्षक दिलीप वाघमारे म्हणाले आपण समाजाच देन लागतो व सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून ते लक्ष्मण(पिंटू) जाधव यांनी सामाजिक काम करतात त्याबद्दल त्यांचा खूप अभिमान वाटतो , यावेळी मुख्याध्यापक राजेश बुरावाड, सहशिक्षक बसवराज आचारे, दिलीप वाघमारे, विनायक राठोड,प्ररसराम राठोड,लिलाबाई राठोड,श्रावण राठोड, जाधव यांचा सहपरिवार सर्वांनी बाळाला शुभ आशीर्वाद व व वाढदिवसाचया शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.