जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम.., ५५ वर्षानंतर प्रथमच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम

0
105

नांदेड/दि११–गोंडजेवली तांडा (ता.किनवट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर नाटिका, विद्यार्थ्यीनींनी बंजारा पारंपरिक वेषभूषेत बंजारा भाषेत गीत सादर करून बहारदार नृत्य केले. कार्यक्रमात कोळी नृत्य , सिने नृत्य , देशभक्तीपर गित विविध गाणी,कविता, नृत्य,विनोदी नाटिका सादर झाले.पचाव्वन वर्षांनी प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलनचा कार्यक्रम संपन्न झाला.
गोंडजेवली व गोंडजेवली तांडाची जिल्हा परिषद शाळा किनवट पासून ६० किलो मीटर आहे. नांदेड जिल्ह्या पासून सुमारे१३०किमी अंतर महाराष्ट्र व तेलंगणा सिमेवर असणारे बहूभाषीक गाव आहे.वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व पालकांचं आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा शाल व नारळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस निरीक्षक अध्यक्ष सुभाष दरिसिंग राठोड होते.तर प्रमुख अतिथी किनवट येथील गटशिक्षणाधिकारी गंगा़धर राठोड,व जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम बाबळे,राजेश बुरावाड यांनी केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड म्हणाले, स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे महत्वपूर्ण भविष्यात एखादा कलाकार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
गाव व्यसनमुक्त झाले पाहिजे. शिक्षणा बरोबर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सुप्तगुणांना वाव मिळाला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजयजी कराड म्हणाले,अध्ययन संस्कार व कलाविष्कार त्रिवेणीचा संघमातून शालेय जीवन फुलते त्याबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी हे क्षेत्र अतिशय उपयुक्त आहे.असे आवाहन केले.
पालक,विद्यार्थी, मुख्याध्यापक,शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत व दोन्ही नायक यांच्या वतीने सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सुधाकर जाधव, सुभाष राठोड, नायक रविंद्र व्यंकटराव राठोड,नायक बळीराम भावसिंग पवार , धारासिंग राठोड, उध्दल राठोड,सत्यनारायण कौड, प्रमोद रत्नाळीकर, ग्यानबा तरटे,अनिल कन्नवार, भिक्खु राठोड,कैलास जाधव,रेखोबा जाधव,सुरेश राठोड,अप्पाराव पेठ, पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण साहेब इस्लापूर व पोलिस गजभारे साहेब इस्लापूर,पत्रकार प्रकाश कार्लेवाड ,संजय विठोरे,तसेच शिवणी,तोंटबा केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन धाकडे,दिलीप वाघमारे,यांनी केले.आभार प्रदर्शन सह-शिक्षक बस्वराज आचारे यांनी केले.