33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश विटा पत्रकार मारहाण घटनेचा जत पूर्वभाग पत्रकार संघटनेकडून निषेध

विटा पत्रकार मारहाण घटनेचा जत पूर्वभाग पत्रकार संघटनेकडून निषेध

0
221

blank

कारवाईच्या मागणीसाठी निवेदन

जत,दि.१५ः विटा शहरांमधील स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली.या घटनेचा निषेध आणि संबंधित दोघा आरोपींवर आणि त्यांना हल्ला करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपींवर कडक कायदेशीर
कारवाई करावी यासाठी उमदी परिसरातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करुन उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विविध दैनिक आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार हल्ला कृती समितीचे तालुकाध्यक्ष राहुल संकपाळ, महादेव कांबळे, लखन होनमोरे, सुभाष कोकळे, राजू पुजारी, विनोद राठोड, रामणा सनाळे, पांडुरंग कोळळी, धानप्पा कोहळी, सतीश आजमाने, रियाज जमादार, राजेभक्षर जमादार, यलाप्पा कावडे यांच्यासह पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

blank