गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सेजगाव (एकोडी) येथे दरवर्षीनुसार याही वर्षी 21 व 22 फेब्रुवारी रोजी वार्षिक उत्सव व पंचकुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन माँ गायत्री प्रज्ञापीठ येथे करण्यात आले आहे. शुक्रवार 21 रोजी दुपारी 12 वाजता मंगल क्लास यात्रा ग्रामदेवता पूजन संध्याकाळी चार वाजता उद्भबोधन आणि दीपयज्ञ, शनिवार 22 रोजी सकाळी १०.३० वाजतापासून पंचकुंडीय यज्ञ, हवन तथा विविध संस्कार, पूर्णाहुती व दुपारी ३ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अखिल विश्व गायत्री परिवार सेजगाव तर्फे करण्यात आले आहे.