धानोरा काळे रस्त्यावर अपघातात दोन जण गंभीर जखमी

0
119

परभणी: येथील पालम रस्त्यावर धानोरा काळे गावाजवळ सोमवार ३ मार्च रोजी सकाळी दोन वाहनांचा अपघात झाला. या  अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून दोघांनाही परभणी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ताडकळस -धानोरा काळे रस्त्यावरील बानेगाव पाटीजवळ थार कंपनीच्या एम. एच.२६ सीई ११६२ व डिजायर क्रमांक एम.एच. २२ ए.एम.९६३२ या दोन वाहनांचा अपघात झाला. या (Dhanora Accident) अपघातात अभिजीत राठोड व राहुल पवार हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना ताडकळस येथील (Parbhani hospital) प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.