बेरडीपार शाळेत”राष्ट्रीय विज्ञान दिवस” उत्साहात

0
31

तिरोडा,दि.०३ः- २८ फेब्रुवारी हा दिवस मोठ्या उत्साहाने, आनंदाने, स्फुर्तीने “राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात असतो. विज्ञान दिनाचे औचित्य साधून पीएमश्री जि. प. उच्च प्राथ. शाळा बेरडीपार (काचे) येथे राष्ट्रीय विज्ञान दिन” हर्षोल्हासात साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमास  उमेश कटरे हे अध्यक्ष म्हणून लाभले. सौ. सुनिताताई शहारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमांस शिशुपाल बिसेन अध्यक्ष शिक्षक पालक समिती, सौ. सरीताताई ठाकरे अध्यक्ष माता पालक समिती बेरडीपार (काचे) होते. त्याचप्रमाणे श्रीमती छन्नुताई टेंभरे, सौ. संगीताताई टेंभरे सौ. चित्राताई मेश्राम, सौ सुषमाताई राउत,सुरेंद्र कोल्हटकर,हौशीलाल दखणे,महेन्द्र राउत, सौ. अनिताताई पटले, सौ. सिमाताई कोल्हटकर सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व पाहुणे मंडळींचे पुष्प गुच्छाने स्वागत शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक माणिक शरणागत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक माणिक शरणागत यांनी केले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता वाढीकडे वाटचाल कशी करायची, आपले व शाळेचे नाव लौकीक करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी काय करायला पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
“राष्ट्रीय विज्ञान दिवस” या कार्यक्रमांत शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जवळ-जवळ 70 ते 80 विद्यार्थ्यांनी आप-आपल्या कल्पकतेने विविध प्रयोग तयार केले. एका शिस्त प्रिय वातावरणात विद्यार्थ्यांनी आपआपल्या प्रयोगाचे सादरीकरण उत्कृष्ठपणे केले. सादरीकरण वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे दिली. दैनंदिन जीवनात त्यांचे प्रयोगाचे महत्त्व शिक्षक व पालकांना पटवून दिले. सर्व पाहुण्यांची मने बाल वैज्ञानिकांनी जिंकली. सर्व बाल वैज्ञानिकांचा प्रयोग सादरीकरणाचा उत्साह व उमंग व्याख्यानन्याजोगा होता.
“राष्ट्रीय विज्ञान दिवस” चे महत्त्व पटवून देतांना श्री. सत्यवान निपाने पदवीधर शिक्षक गणित विज्ञान यांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. सर सी.व्ही. रमण यांच्या जीवन कार्य व त्यांनी केलेल्या विविध संशोधनाची माहिती दिली. सर सी. वी. रमन यांच्या रमन इफेक्ट विषयी विस्तृत माहिती दिली. सोबतच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, शॉमस अल्वा एडिसन यांच्या विज्ञान क्षेत्रात केलेल्या योगदाना-बद्दल श्री निपाने सरांनी उपस्थितांना महत्त्व पटवून सांगितले.

कार्यक्रमांचे उत्कृष्ठ सूत्र संचालन रविन्द्र बावणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. वर्षा मुळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी तेजलाल बोपचे , पंकज असाटी, सौ. मंगला कटरे,संदिप इंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले.