गोंदिया ते दुर्ग पॅसेंजर सुरू करा

0
17

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळ रेल्वे ग्राहक सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे पार पडली. यात सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान गोंदिया ते दुर्ग पॅसेंजर गाडी सुरू करण्याच्या मागणीसह प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधांकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष आकर्षित करण्यात आले.
सदर बैठकीय विभागीय रेल्वे युझर्स कन्सल्टटेटिव्ह कमिटीचे सदस्य गोकूल कटरे यांनी विविध समस्या मांडून त्यांच्या निवारणाची मागणी केली. यात धानोली रेल्वे स्थानकाच्या फलाटापासून बाहेरील प्रवेशद्वारापर्यंत प्रकाश व्यवस्था, रेल्वे स्थानक रस्त्याचे बांधकाम, धानोली रेल्वे स्थानकात प्रवाशी प्रतीक्षालय तयार करणे, प्रवाशी शेड्स तयार करणे, स्थानकावर ठिकठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था करणे, प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
यासह चंद्रपूर, बालाघाट, छिंदवाडा, वर्धा व इतर मार्गांसाठी तिकिटांचा पुरवठा करणे व गोंदिया ते दुर्ग पॅसेंजर गाडी सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान संचालित करण्यात यावे. आरक्षणात प्रवाशांची वाढती वेटिंग लिस्ट पाहता गोंदियातून आणखी रेल्वेगाड्या संचालित करण्यात याव्या. तसेच गोंदिया-आमगाव मार्गावर किंडगीपार व गोंदिया-तिरोडा मार्गावरील काचेवानी रोडव् ार ओव्हर ब्रिजचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल होते. तसेच यावेळी प्रामुख्याने उप रेल्वे व्यवस्थापक गुप्ता, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मुखोपाध्याय, रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सदस्य हरिंद्र मेठी, निलम हलमारे (गोंदिया), प्रताप मोटवानी (नागपूर), रेणू चांडक (छिंदवाडा), सगदेव (वडसा), आशिष शुक्ला (डोंगरगड), राजेंद्र व्यास (राजनांदगाव) आदी उपस्थित होते.

आमला- बैतुल पॅसेंजर इटारसीपर्यंत वाढवावी, नागपूर स्थानकावर दोन्ही बाजूने अपंगांसाठी पार्किंगची वेगळी व्यवस्था करावी, प्लॅटफॉर्म क्र. २-३वर प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, पूर्व बाजूला प्रवासी प्रतीक्षागृह निर्माण करावे, नागपूर-भुसावळ पॅसेंजर व नागपूर-बिलासपूर इंटरसिटीमध्ये आरक्षणाची व्यवस्था करावी, सेवाग्राम स्थानकावर रॅम्प बांधावा, चंद्रपूर स्थानकावर दोन्ही बाजूला आरक्षण व पार्किंगची व्यवस्था, सर्व सुपरफास्ट गाड्यांना चंद्रपूरला थांबा द्यावा, बल्लारशा-नागपूर शटल ट्रेन सुरू करा, नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस रोज सुरू करा, नागपूरवरून पाटण्यासाठी जबलपूर, अलाहाबादमार्गे नवीन गाडी सुरू करावी, नागपूरवरून पुण्यासाठी रोज दुरांतो एक्स्प्रेस सोडावी, अशाही सूचना या बैठकीत सदस्यांनी केल्या. त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन सिंह यांनी दिले.
सतीश बंग, हर्षवर्धन सिंघवी, दिलीपभाई ठकराल, कृष्णकुमार पांडे, रोहित अग्रवाल, डॉ. अनिल लद्दड, प्रभाकर सुंचुवार, बृजभूषण शुक्ला, शिवचरण मिश्रा, जितेंद्र देसाई, विजय गुल्हाणे हे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. आभार मंडळ वाणिज्य व्यवस्थापक बी.एल. कोरी यांनी मानले. यावेळी एडीआरएम डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ मंडळ परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, वरिष्ठ मंडळ यांत्रिक इंजिनीयर आर.के. द्विवेदी, वरिष्ठ मंडळ इंजिनीयर डी.आर. टेंभुर्णे, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जे. राव, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.