रिलायन्स गुजरातमध्ये 1 लाख कोटी गुंतवणार

0
15

गांधीनगर : गुजरातच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसल्याचं दिसतं आहे. त्यामुळंच यंदाच्या वायब्रंट गुजरात समीटला जागतिक स्वरुप प्राप्त झालं आहे. आज सुरु झालेल्या या समीटसाठी जगभरातून उद्योजक, राजकारणी आणि देश-विदेशी उद्योग समुहांचे प्रतिनिधी गांधीनगरमध्ये दाखल झाले आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बान की मून, जॉन केरी असे अनेक देशांचे प्रमुख हजर आहेत. त्यासोबत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख, देशी-विदेशी दिग्गज उद्योजक आदींचीही या कार्यक्रमात खास हजेरी आहे.
रिलायन्सची बीग इन्व्हेस्टमेंट :
या कार्यक्रमात अनेक दिग्गज कंपन्यांचे प्रमुख उपस्थित आहेत. त्यात सुझुकी, रिलायन्स यासह बहुतांश कंपन्यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा घोषणा केली.
मुकेश अंबानी हे मोदींचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळं मोदींच्या वायब्रंट गुजरातच्या स्वप्नपूर्तीसाठी अंबानींनी पूर्ण तयारी केल्याचं स्पष्ट होतं आहे. त्यामुळं देशातील प्रमुख उद्योजक असलेल्या अंबानींच्या रिलायन्स उद्योग समुहाच्या रुपाने गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.
रिलायन्स बरोबरच बिर्ला, सुझुकी, हिरे उद्योजक असा दिग्गज उद्योजकांनीही गुजरातमध्ये मोठ्या गुतंवणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळं मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये मोठ-मोठे उद्योग समुह आणण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे.