मंत्रिमहोदय, आपण बोलते होणार तरी केव्हा?

0
17

पालकमंत्री-पत्रकार संवादाचा मुहूर्तच निघेना

गोंदिया- आघाडी शासनाच्या १५ वर्षाच्या कालावधीत गोंदिया जिल्हा हा मंत्रिपदापासून वंचित होता. मात्र, राज्यात युतीचे शासन येताच हा वनवासही संपला. जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपदासह स्वजिल्ह्यातूनच पालकमंत्रीपद सुद्धा मिळाले. यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा साहजिकच उंचावल्या. परंतु, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी अद्यापही जिल्ह्याच्या विकासाचे त्यांचे काय व्हीजन आहे, यावर महिना उलटूनही कोणताही संवाद साधला नाही. परिणामी, ना. बडोले हे पालकमंत्री-पत्रकार संवादासाठी एखाद्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत तर नसावे ना? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. मंत्रिमहोदय बोलते व्हा, आमच्या विकासाबद्दल तुमचे ंमत तरी कळू द्या, अशी मागणी आता समोर आली आहे.
आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अन्य जिल्ह्यातील मंत्र्यावर जबाबदारी असायची. त्यावेळी विरोधक अगदी पोटाच्या बेंबीपासून सूर लावत अनेक आरोप करायचे. पालकमंत्री तर केवळ झेंडामंत्री असे बोलले जायचे. परंतु, युतीच्या शासन काळात गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी ही सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांचेकडे आली. ना. बडोले हे स्थानिक असल्याने नागरिकांच्या साहजिकच उपेक्षा उंचावल्या. ५ डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. बडोले हे २१, २५, २७ डिसेंबर, ४, ५ व ११ जानेवारीला गोंदिया जिल्ह्यात वास्तव्यास होते. २६ डिसेंबरला पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी जिल्ह्याचे ३ दौरेसुद्धा केले. यात गोंदिया येथे २ तर सडक अर्जूनी येथे शासकीय कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. उल्लेखनीय म्हणजे शनिवार व रविवार हो गोंदिया साठी राखीव दिवससुद्धा आहेत. असे असले तरी या कालावधीत ना. बडोले यांनी पत्रकारांशी संवाद करण्याचे जाणीवपूर्वक का टाळले? हे कळायला मार्ग नाही. प्रत्येक दौèयात माध्यमांना सामोरे जाऊन जिल्ह्याच्या जनतेविषयी त्यांच्या मनात काय आहे, हे सांगणे गरजेचे आहे. परंतु, जनतेला माध्यमांच्या साहाय्याने आपली भूमिका स्पष्ट न करता मंत्रिमहोदय हे एका खासगी हॉटेलात शासकीय विभागांना साहित्य पुरवठा करण्याèया कंत्राटदारांनी आयोजित पार्टीला मात्र हजेरी लावतात, हे येथे विशेष.
राज्यातील सर्वच जिल्ह्याचे पालकमंत्री हे माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधून आपल्या जिल्ह्याचा विकास आराखडा मांडत असताना गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मात्र अद्यापही मुहूर्त गवसला नसल्याने सर्वत्र खेद व्यक्त होत आहे. qकबहुना, मंत्रिमहोदय हे स्वतः संवादहीन झाले की त्यांच्या काही अडचणी आहेत, यांचाही शोध घेतला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.