काँग्रेसच्या विचारसरणीत बदल करावा? सोनिया गांधींचं ज्येष्ठ नेत्यांना पत्र

0
19

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं काँग्रेसच्या विचारसरणीत बदल करण्याची आवश्यकता आहे का असा प्रश्न विचारणारं पत्र लिहिलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करताना काँग्रेसची प्रतिमा मुस्लिम धार्जिणीही होत असल्याचा निष्कर्ष काढला होता.
त्याआधारे सोनिया गांधींनी हे पत्र पाठवल्याची चर्चा आहे. येत्या १३ तारखेला काँग्रेसच्या संसदीय पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक होते आहे. या बैठकीआधी सोनियांनी सर्व पदाधिकाऱ्यांना हे पत्र लिहून त्यांची मतं विचारली आहेत. या पत्रात कुठल्याही धर्माचा उल्लेख नसला, तरी काँग्रेसच्या विचारसरणीत बदल करण्याची वेळ आल्याचे संकेत या पत्रातून देण्यात आले आहेत.13 तारखेच्या बैठकीचा अजेंडा ठरवण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सूचनाची या पत्राद्वारे मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळं पराभवामुळं काहीशा बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये आता काय बदल होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे