लिंगापूर येथे यंदा भव्य शिवजन्मोत्सव सोहळा

0
11

संयोजक भागवत देवसरकर यांची माहिती
नांदेड,दि.15ः -कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लिंगापूर ता. हदगाव येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सोहळ्याचे संयोजक तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत अमोल मिटकरी राहणार आहेत. यावेळी परिसरातील समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा कार्यगौरव करण्यात येणार आहे. सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती खा. संभाजीराजे यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृषीक्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिवजन्मोत्सव सोहळ्यात लाभणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते लिंगापूर येथील शिवजन्मोत्सव सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगाधर बनबरे, प्रदीपदादा साळुंके, प्रा. नितीन बानगुडे पाटील, प्रवीणदादा गायकवाड आदी वक्ते लाभले आहेत.
लिंगापूर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नियोजित जागा निश्चित करून दोन वर्षांत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. हा सोहळा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्वच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देणार असल्याची माहिती संयोजक भागवत देवसरकर यांनी दिली. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे पदाधिकारी संतोष देवसरकर, शिवाजी देवसरकर, नामेश्वर देवसरकर, अविनाश देवसरकर, नरेश देवसरकर, बापुराव देवसरकर, यज्ञवलकी देवसरकर यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते.