बाल कलाकाराने प्रेक्षकांनचे  मने जिंकली 

0
13
नांदेड दि.२१: :- बिलोली तालूक्यातील कासराळी येथील महात्मा गांधी इंग्लिश मेडियम स्कुल येथे आठवे वार्षिक  स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली.या समेंलनाचे  उदघाटन जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तमुस अध्यक्ष सूर्यकांत महाजन,दत्तु पाटील नरगंले, प्रभारी सरपंच शेषेराव लंके,सरूबाई गंदमवाड ग्रा प सदस्य,शिवानंद सोमासे,संग्राम इजूलकंटे,मारोती वरुडकर,भागवत,अमित हानमोड, लोकमनवार, बालाजी गंगुलवार,बाळू तोटावार, नीलेश माळी व  आदि उपस्थित होते.
ठक्करवाड यांनी बाल कलाकराना शुभेच्छा देत शाळेला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.लहान लहान बालकांनी कलाकारांना लाजवेल अशा हिन्दी , मराठी गीतांवर नृत्य सादर करुन प्रेक्षक,पालका आणि शिक्षिकांचे मने जिंकली.प्रास्तविक मुख्याध्यापिका अंजन्ना कोरे केले.यशस्वीतेसाठी सहकारी शिक्षिका सौ.सुरेखा सरकोंडावार , सौ.मोहिनी पोतदार यांनी सहकार्य केेले.सुरेखा सुरेखा सरकोंडावार यांनी आभार मानले