बनावट परिक्षार्थी प्रकरणामध्ये 15 जणांना अटक 

0
9

नांदेड,दि.07-बनावट परिक्षार्थीच्या माध्यमातून परीक्षा देवून अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिलेल्या प्रकरणात आज राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने  एकूण 15 जणांना पकडले आहे. याप्रकरणात आजपर्यंत अटक झालेल्यांची संख्या 25 झाली आहे.या प्रकरणात बनावट परिक्षा देवून उत्तीर्ण झालेले आणि नोकरीवर असणाऱ्या 13 जणांना किनवट येथून आणि दोन जणांना हिंगोली येथून राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने पकडले आहे. त्यांची नावे अशी आहेत. अक्षय संजय राठोड (वय 27) , अंकुश प्रल्हाद राठोड (वय 31), मनोज बालचंद जाधव (वय 37), अमोल माधव श्रीमनवार (वय 33), रामहर्ष सुभाष निळकंठवार (वय 29),सुरज मिनिराम चव्हाण (वय 29), अमोल गणपत दासरवाड (वय 31), विठ्ठल नारायण कोकुलवार (वय 29), संजय देवराव कुमरे (वय 32), साहेबराव भिकू चव्हाण (वय 38), शिवालाल वामन जाधव (वय 30), सुरज धुर्वास जाधव (वय 31), श्रीकांत सुभाष चव्हाण (वय 33), नरेंद्र पांडूरंग पवार (वय 32), जगदीश रत्नसिंह राठोड (वय 41) अशी आहेत.

राज्य गुन्हे अन्वेश विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक शंकर केंगार, उपअधिक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक यु.आर.थिटे, पी.एम. आचेवाड, राजकुमार पाडवी, पोलीस कर्मचारी किरण डोके, रामलिंग स्वामी, राजेंद्र मोरे, आर.आर.सांगळे, रोहिणकर यांनी ही कार्यवाही केली आहे. याबाबतचा गुन्हा मांडवी पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल असल्याने या सर्व पंधरा जणांना उद्या किनवट न्यायालया समक्ष सादर केले जाणार आहे.