देशातील आठवी सर्वात मोठी कंपनी सन फार्मा

0
22

मुंबई – सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ही औषध कंपनी बाजार भांडवलाच्या (मार्केट कॅपिटल) हिशेबाने देशातील आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. मंगळवारी सन फार्माचे मार्केट कॅप देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयपेक्षाही जास्त रकमेवर पोहोचले आहे.
मंगळवारी सन फार्माच्या शेअर्समध्ये १.१२ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. यानंतर कंपनीचे बाजार मूल्य २ लाख १५ हजार ३३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एसबीआयचे शेअर्स ०.४१ टक्क्याने तेजीत राहिले. कंपनीचे बाजार मूल्य २ लाख ११ हजार १३१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. टाटा समूहाची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ५ लाख, ५ हजार, ५२८ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून कायम आहे.असे मोजतात मार्केट कॅप
कंपनीच्या सर्व शेअर्सच्या संख्येला शेअर्सच्या भावाने गुणल्यानंतर मार्केट कॅप मिळते. प्रवर्तक वा व्यवस्थापनाची मालकी असलेले शेअर्स वगळल्यानंतरचे उर्वरित शेअर्स हे बाजारात ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात. त्यांना फ्री-फ्लोट असे संबोधले जाते.