पुणे-नागपूर हवाई प्रवास केवळ 999 रुपयांत, Go Air ची 22 शहरांसाठी खास ऑफर

0
14

वृत्तसंस्था
नवी दिल्ली- हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांकडून एकापेक्षा एक चांगला ऑफर दिल्या जात आहेत. स्पाइसजेट आणि जेट एअरवेज यांच्यानंतर वाडिया समुहाच्या गो एअरवेजने फेअर वॉरमध्ये उडी मारली आहे. गो एअरवेजने ‘गो एक्सप्लोर’ या नावाने सुरु केलेल्या या ऑफरमध्ये केवळ 999 रुपयांत तिकीट विकण्यास आजपासून सुरवात केली आहे. विशेष म्हणजे 22 शहरांसाठी ही ऑफर असून यात पुणे-नागपूर हवाई प्रवासाचा समावेश आहे.
अशी आहे ऑफर
– 999 चे हवाई भाडे एका बाजूच्या प्रवासाचे आहे. याशिवाय अंतराचा विचार करुन प्रवासाचे भाडे 1499 आणि 1999 रुपयेही ठेवण्यात आले आहे.
– तिकीटांचे बुकिंग 21 मार्च ते 23 मार्च 2015 या तीन दिवसांमध्ये करावे लागणार आहे.
– प्रवाशांना 23 जुन ते 31 ऑक्टोबर या दरम्यान प्रवास करावा लागेल.
नियम आणि अटी
– कंपनीची वेबसाईट https://www.goair.in/ वर जाऊन तिकीट बुक करावे लागेल. तिकीट बुकिंग काऊंटरवर याची बुकिंग केली जाणार नाही.
– ग्रुप बुकिंगसाठी ही ऑफर नाही.
– यात लिमिटेड सीट्स आहेत. जो पहिले बुक करणार त्यालाच सीटचे बुकिंग दिले जाईल. सीट संपल्यावर बुकिंग केले जाणार नाही.
– तिकीट रद्द करता येणार नाही. तिकीट रद्द केले तर केवळ एअरपोर्ट टॅक्सची रक्कम परत केली जाईल.
– फ्लाईट डिटेल्समध्ये बदल करण्यासाठी प्रवाशांना रेग्युलेटरी परवानगी घ्यावी लागेल.
– कोणतीही नोटीस न देता किंवा कोणत्याही वेळी ही ऑफर रद्द केली जाऊ शकते.
– ही ऑफर डायरेक्ट रुट फ्लाईट आणि कनेक्टिंग फ्लाईट या दोन्हीसाठी आहे.