प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांना पाण्याचे नोबेल

0
20

मुंबई: देशातले प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या कामाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनोखा सन्मान करण्यात आला आहे. पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा स्टॉकहोम वॉटर प्राईज हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

पाण्याचे नोबेल अशी या पुरस्काराची ओळख आहे. स्वीडनमध्ये येत्या 26 ऑगस्ट रोजी हे पारितोषिक दिले जाणार आहे. राजस्थानसारख्या टंचाईग्रस्त भागात राजेंद्रसिंह यांनी पाण्याच्या क्षेत्रात मोठं काम केलं आहे. हजारो जोहड निर्माण करुन त्यांनी या भागातलं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय अलीकडच्या काळात त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचंही कार्य हाती घेतलं आहे.
राजस्थानमध्ये हजारो ‘जोहड’ निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्रसिंह प्रसिद्धीस आले होते. त्यांनी ‘तरुण भारत संघ’ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये असे जोहड निर्माण केले.याआधी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे आणि बिंदेश्वर पाठकर या भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे.