पीक विमा शंभर टक्के वाटप होईल याची दक्षता घ्यावी- पालकमंत्री रामदास कदम

0
25

नांदेड, दि. 2:- पीक विमा कंपनी यांच्याशी समन्वय साधून मोहीम हाती घेऊन पिक विमा शंभर टक्के शेतकऱ्यांना वाटप होईल याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. पिक परिस्थिती, पाणी टंचाई, पिक विमा, कर्ज माफी, पिक कर्ज वाटप,अपंग लाभार्थी निवडणे आदी विषयावर पालकमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रमागृह नांदेड येथे आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धाविकास, मत्यविकास मंत्री अर्जुन खोतकर, आमदार  सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी, अपर जिल्हाधिकारी  खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी  शरद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कदम म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा संदर्भात सविस्तर चर्चा होऊन कंपनी व अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. तेंव्हा शासन निर्णयातील तरतूदीनुसार ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. त्या  सर्व शेतकऱ्यांना पिक विमा रक्कमेचे वाटप होईल, यासाठी संबंधित पिक विमा कंपनी यांच्याशी समन्वय साधून मोहीम हाती घेऊन पीक विमा शंभर टक्के वाटप होईल याची दक्षता घेण्याकत यावी. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री श्री. कदम यांनी दिले.
मनपाने घनकचऱ्याची विल्हेवाट करण्याबाबत विलंब न करता तात्काळ कार्यवाही करावी. जिल्ह्या त विविध विकास कामांच्या योजनेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावीत यासाठी निधी उपलब्धयता करुन दिली जाईल. प्लास्टीलकची आवक होत असल्यायस यावर निर्बंध टाकण्यात यावेत. पाणीटंचाई संदर्भात बैठक घेण्यात आली असून आवश्यक उपाय योजना करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या  यादीनुसार दिव्यांग  लाभ देवून कुठलाही लाभार्थी अनुदान व साहित्यपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश  पालकमंत्री श्री. कदम यांनी  दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नांदेड यांनी निदर्शनास आणुन दिले की, भाग्यश्री माधवराव जाधव, ही होनवडज ता.मुखेड येथील शेतकरी कुटूंबातील आहे. चीनमध्ये बिजिंग शहरात 2019 रोजी पार पडलेल्या  जागतिक पॅराअॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक स्पर्धेत कास्यपदक मिळवून भारताचा झेंडा उंचावणारी दिव्यांग मुलगी असून त्यांनी कास्ये पदक मिळविल्यास 1 लक्ष अर्थसहाय्य, रोपय पदक असल्यास 1.50 लक्ष व सुवर्णपदक   मिळवल्यास 2 लक्षची आर्थिक मदत देण्यास येते. तेंव्हा त्यांनी कास्य पदक मिळविले असल्या्ने त्यांना रुपये 1 लक्ष अर्थसहाय्य मंजूर करता येईल. यावर मा.पालकमंत्री महोदयांनी निर्देश दिले की, त्यांना रुपये 2.00 लक्षची मदत महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात यावी, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे यांनी जिल्ह्यातील 11 लाख शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम जमा करण्याकत आली आहे, अशी माहिती दिली .
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नांदेड पाटबंधारे मंडळ अधिक्षक अभियंता  एस.के.सब्बीनवार, सार्वजनिक बांधकांम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, नांदेड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी  महेश वडदकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर.बी.चलवदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पा संचालक नईम कुरेशी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, तहसिलदार  किरण अंबेकर, मनपाचे पाणीपुरवठा  कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, पशुसंवर्धन उपायुक्त श्री. रत्नपारखे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी  सतेंद्र आऊलवार, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. निनावे आदि विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती हीती.
आदित्य ठाकरे यांचे हस्ते गोदावरील पुलाचे भुमीपूजन
नांदेड जिल्ह्यातील मोहनपुरा वाहेगाव येथील गोदावरील नदीवरील पुलाचे भुमीपूजन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हस्ते आज वाहेगाव येथे संपन्न झाले.यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्यविकास मंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील, आमदार  सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे आदी विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.