सोन्याचा भाव आला २७ हजारांच्या खाली

0
18

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २७ हजाराखाली गेला. व्यापाऱ्यांनी मागणी कमी केल्याने दिल्लीत सोन्याचा भाव २६,८७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. चांदीचा भावही ६० रुपयांनी घटून ३६,८०० रुपये प्रतिकिलोवर राहिला.

सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिला. तेथे सोन्याचा भाव १,२०० डॉलर प्रतिऔंसखाली आला. सराफा व्यापारी आणि आभूषण निर्मात्यांची मागणीही कमी झाल्याने स्थानिक बाजारात सोन्याच्या भाव घसरण नोंदली गेली आहे.सिंगापूूर येथे सोन्याचा भाव १,१९२.७८ डॉलरवरून घटून १,१९१.४७ डॉलर प्रतिऔंस झाला.
राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १८० रुपयांनी घटून अनुक्रमे २६,८७० रुपये व २६,७२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात काल ७० रुपयांची घट
झाली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,६०० रुपयांवर कायम राहिला.