संख(राजेभक्षर जमादार),दि.15ः-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाहणीसाठी मुंबईतून दाखल झालेल्या युवासेनेच्या चमूने शेतकर्यांशी चर्चा केली तसेच शेतावर जाऊन पाहणी केल्यानंतर सदर नुकसानीची माहिती युवा सेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांना देणार असल्याचे युवा सेना सचिव दुर्गाताई भोसले यांनी म्हटले आहे.जत तालुक्यातील संख परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या फळपिकांचे व शेतीपिकांच्या नुकसानाची माहिती घेण्यासाठी युवासेनेच्या महाराष्ट्र सचिव दुर्गाताई भोसले व युवासेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची टीम जत तालुक्यातील संख येथे दाखल झाली.त्यांनी सदाशिव वालीकर अंकलगी व सुजाता रवी कोळी यांची द्राक्ष बागायत तसेच संख येथील अर्जुन गुरुबाळ माळी,पंडित गुरुबाळ माळी, श्रीमंत सिद्धाप्पा माळी, श्रीशैल रमण्णा माळी ,गोविंद हरी चव्हाण लमाणतांडा यांच्या डाळिंब बागेची व फळपिकांची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
संखच्या शिवाजी चौकात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा चमूसमोर मांडल्या.यावेळी दुर्गाताई भोसले म्हणाल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेने प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. संदर्भातील यासंदर्भातील सर्व माहिती पक्षप्रमुख व युवा सेना प्रमुख यांना देऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करू. तसेच महाराष्ट्रात फक्त शिवसेनेनेच राज्यभर भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना मदत मिळाल्या स्वस्त बसणार नसल्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच शेतकरी पंचनाम्यासाठी मुदत वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी या दौऱ्यात युवा सेना जिल्हाप्रमुख अडवोकेट मिलिंद कदम, मिलिंद कदम, सुमन ताई फातर्पेकर युवा सेना कोर कमिटी सदस्य, किरण सावंत युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य, युवा सेना सांगली जिल्हा प्रमुख रणजित जाधव, विनायक गोंदील खानापूर युवासेना, तालुकाप्रमुख आकाश माने ,सांगली शिवसेना उपजिल्हाप्रमुख तम्मा कुलाळ, सिद्धू गायकवाड, व्यंकटेश जोशी ,रामा घुमरे, माळाप्पा करे ,सुमित चव्हाण इत्यादी उपस्थित होते.या दौऱ्याचे संयोजन युवा सेना तालुका प्रमुख नागनाथ मोठे, युवा सेना उपतालुकाप्रमुख प्रवीण औलादी यांनी केले.





