कोलकत्ता:-पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांचे आज गुरूवारी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची तब्बेत ठीक नव्हती. त्यांनी ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी २००० ते २०११ या अशी ११ वर्षे आपली कारकीर्द गाजवली होती.
सीपीआय (एम) पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी भट्टाचार्य यांच्या निधनाची माहिती दिली. बुध्ददेव भट्टाचार्य हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. पक्षातील अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची मानली जात होती. तब्बेतीमुळे मागील काही वर्षांपासून ते पक्षात सक्रीय नव्हते. 2015 मध्ये त्यांनी पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा राजीनामा दिला होता. कोलकाता येथील घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. तब्बेत अधिक खालावल्याने त्यांना जुलै महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी आहे.
बुध्दवेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकातामध्ये झाला होता. त्यांच्या पुर्वजांचे घर बांग्लादेशमध्ये आहे. कोलकाता येथील प्रतिष्ठित प्रसिडेंसी कॉलेजमध्ये बंगाली साहित्याचे शिक्षण घेतले. बंगाली (ऑनर्स) या विषयात बीए ही पदवी प्राप्त केली होती. शिक्षण घेत असतानाच ते सीपीआयशी जोडले गेले. सीबीआयच्या यवा शाखेच्या डेमोक्रेटिक यूथ फेडरेशनचे राज्य सचिव म्हणून भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर या फेडरेशनचे डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले.