भंडारा,दि.08 : कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 जिल्हयाअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने यामध्ये कार्यरत ज्या शासकीय, निमशासकीय खासगी, कंपनी, महामंडळे ई. कार्यालयात जेथे 10 हुन कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती प्राधिकाऱ्यांविरुध्द तक्रारी आहेत, अशा कार्यालयातील लैंगिक छळाच्या तक्रारी महिला स्थानिक तक्रार समिती, भंडारा यांचेकडे करु शकतात.
अशा तक्रारी स्विकारण्याकरिता जिल्हयातील जिल्हा अधिकारी (District Officer) म्हणजेच उप जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण किंवा आदिवासी क्षेत्रासाठी प्रत्येक गट, तालुका व तहसिल मध्ये आणि नागरी क्षेत्रातील प्रभाग व नगरपालिका मध्ये. एका समन्वयक अधिका-यांची निवड करण्याबाबतची तरतूद आहे. त्याअन्वये भंडारा जिल्हयामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी स्विकारण्याकरिता कायद्याचे कलम 6 (2) अन्वये जिल्हा- अधिकारी (काठिमलेछसंअ) यांचे कार्यालयीन आदेश क्र. जा.क्र. निमबावि अ/ काठिमलेछर्सअ/ नोअ/ 1493/2023-24 दि. 29/12/2023 अन्वये भंडारा जिल्हयामध्ये तहसिल क्षेत्राकरिता तहसिलदार (सर्व तालुके) यांना, गट क्षेत्राकरिता बाल विकास प्रकल्प अधिकारी (सर्व तालुके) यांना नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्राकरिता मुख्याधिकारी (सर्व नगरपरिषद) यांना तर नगरपरिषद भंडारा येथिल प्रभागस्तरावर कर सहाय्यक, नगरपरिषद, भंडारा यांना तसेच आदिवासी क्षेत्राकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प, भंडारा यांना लैंगिक छळाच्या तक्रारी स्विकारण्याकरिता नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
तरी तक्रारकत्यांनी स्थानिक तक्रार समितीकडे सादर करावयाच्या लैंगिक छळाच्या तक्रारी संबंधित नोडल अधिकारी यांचेकडे सादर कराव्यात. त्यांचेमार्फत सदरच्या तक्रारी स्थानिक तक्रार समिती, भंडारा यांचेकडे कार्यवाहीस्त्व वर्ग करण्यात येतील. तसेच पीडीत महिला या ऑनलाईन SHE BOX शी बॉक्स प्रणालीद्वारे देखील त्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी स्थानिक तक्रार समितीकडे सादर करु शकतात. असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी भंडारा यांनी केले आहे.