पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

0
44

नवी दिल्ली – आपल्यापैकी कोणी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे. सरकारकडून पुन्हा एकदा पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख देण्यात आली होती. ही मुदत आता सहा महिन्यांनी वाढवण्यात आली असून आधार आणि पॅन कार्ड ज्यांनी अद्यापपर्यंत लिंक नसेल केले, ते आता ३१ मार्च २०२२ पर्यंत करू शकतात. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहिती आयकर विभागाने ट्विट करून दिली आहे. आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख, जी आधी ३० सप्टेंबर होती, ती आता कोरोना महामारीमुळे करदात्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांमुळे आणखी ६ महिने वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारने यावर्षी चौथ्यांदा आधार-पॅन लिंक करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. याआधी जुलै महिन्यात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे येणाऱ्या अडचणींमुळे सरकारने शेवटची तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याच्या काही टीप्स

  • पॅन कार्ड-आधार कार्डला लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • आपला पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, नाव आणि मोबाईल नंबर त्या वेबसाईटवर टाका.
  • आधार कार्डवर फक्त जन्मवर्षच असेल तर “I have only year birth in Aadhar Card” या पर्यायावर क्लिक करा. पूर्ण जन्मतारीख असेल तर हा पर्याय निवडण्याची गरज नाही.
  • त्यानंतर “I agree to validate my Aadhar details” या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा. अशाप्रकारे आधार कार्ड आणि पॅन कार्डसोबत लिंक होईल.