आठ कोटीच्या बांधकामाचे भिजत घोंगडे;नगरे झाली खड्डेमय

0
29

# मंजुरीवर सामान्य फंडाचे २१लक्ष खर्च
#आमदारांच्या अट्टहासापुढे प्रशासन हतबल

आमगाव :- आमगाव नगरपरिषद अंतर्गत आठ गावांचे दुर्दव्य की नागरिकांना सुविधांची तडजोड करण्यासाठी स्वताच्या जमा केलेल्या फंडाचे निधी खर्च करून सुद्धा विकास कामे पदरात पाडून घेता आले नाही.
नगर परिषद परिक्षेत्रात वैशिष्ट पूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत २०१८-१९ला निधी मंजूर करण्यात आले, परंतु या बांधकामाचे राजकारण करत २१लक्ष रुपये खर्च करून हाती भोपळा मिळत आहे.ही शोकांतिका निर्माण झाली आहे.
आमगाव नगर परिषद चा विषय न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे पूर्वीच आठ गावातील विकास कामासाठी शासनाकडून सार्थक मदत मिळत नाही,त्यामुळे रस्ते,नाले,पाणी पुरवठा, आवास योजना,व नागरिकांना मिळणाऱ्या योजना ठप्प झाली आहे.
न्यायालयीन प्रकरणाला सलग सहा वर्षे लोटली परंतु नगर परिषद चा विषय निकाली काढण्यासाठी शासनाला यश आलं नाही.त्यामुळे नागरिकांसाठी विकास हा हास्यास्पद वर्तुळ ठरला आहे.
यातच एखादा निधी मंजूर झालाच तर यात राजकारण पुढे करून डावलण्यात येत असल्याचे चित्र आहे.
आमगाव नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावांच्या विकासाकरिता सन२०१८-१९ ला शासनाने वैशिष्टपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान यातून आठ कोटी निधी मंजूर करण्यात आले.
सदर बांधकाम नियोजन प्रस्ताव प्रमाणे नगरपरिषद ने निविदा प्रक्रिया केली तर याच बांधकामाचे दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया केली.परंतु निविदा उघडण्याचा मार्ग थांबून घेण्यात आले. यातच स्थानिक सत्ता पालट होऊन आमदार बदलल्याने सद्यस्थितीत असलेले आमदार सहेसराम कोरोटे यांनी या बांधकामाचे प्रक्रिया बदल करून सर्व कामे सार्वजनिक बांधकाम PWD गोंदिया कडे वर्ग केल्याने पूर्वीच्या निविदा बाद करण्यात आले. यात सदर बांधकाम प्रकल्प संचालक यांच्या मंजुरी व इतर खर्चावर पूर्वीच नगर परिषद ने सामान्य फंडातून सलग २१लक्ष रुपये खर्च केले.
यात शासनाने आदेश काढून बांधकाम निधी मंजूर केला तर पूर्वीच्या प्रस्थावतील नियोजित कामे ही बदलण्यात आले.परंतु बदल करून मंजूर करण्यात आलेले बांधकामाचे निविदा प्रक्रियाच पूर्ण करण्यात आले नाही. तर
मंजूर निधी पूर्वी नगरपरिषद व नंतर सार्वजनिक बांधकाम pwd असा वर्ग झाल्याने निधीचे खाते बदल झाले यामुळे निधीची तांत्रिक अडचण निर्माण करण्यात आली आहे.या सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रशासन व जनप्रतिनिधींना यश आले नाही .त्यामुळे बांधकाम विकास अभावी नागरिकांचे हाल झाले आहेत. नगर परिषद परिक्षेत्रातील नागरिकांना चिखलमय रस्त्यातून वाट काढावी लागत आहे.नाल्याची दुरवस्था मुळे पावसाचे पाणी घरात शिरत आहे.रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे नागरिकांना मृत्यूचे आमंत्रण देत आहेत .
नगर परिषद ने मंजूर निधीतून पूर्वीच कामे केली असती तर उद्भवलेल्या परिस्थिवर निराकरण झाले असते,पण या राजकीय अट्टहासपुढे नागरिकांचे हाल झाले तर प्रशासन ही हतबल ठरले आहे.
(बॉक्स)तांत्रिक अडचणीमुळे निधी अडला:-आ. कोरोटे
आमगाव नगर परिषद ला वैशिष्टपूर्ण कामासाठी आठ कोटी पूर्वीच मंजूर झाले,सदर कामे सार्वजनिक बांधकाम pwd कडे आहेत.तांत्रिक अडचण असल्यामुळे निधी मिळाला नाही. प्रयत्न सुरू आहेत ,कामे होतील असे मत वेक्त केले.
# नगर परिषद अहवाल
(बॉक्स)नगर परिषद कडे निधी पडून मग कामे का नाही.
:-आमगाव नगर परिषद ला वैशिष्टपूर्ण बांधकामाचे आठ कोटीचा निधी मंजूर असून निधी उपलब्ध आहे .टेंडर पडून आहेत.परंतु जनप्रतिनिधी यांनी मंजूर बांधकामे व निधी सार्वजनिक बांधकाम विभाग pwd कडे वर्ग केल्याने सदर बांधकाम pwd करणार आहे.पण नगर परिषद ला मंजूर निधी हा pwd ला हस्तांतर होत नाही.यासाठी मंत्रालयाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. यामुळे आठ कोटीचे बांधकाम मात्र अट्टहासपुढे पडले आहे. हेच कामे नगर परिषद ने केले तर अडचण नाही ,निधी पडून आहे कंत्राट होऊन कामे गतीने होतील यात जनप्रतिनिधीनी सहभाग घ्यावा तर कामे पूर्ण होतील.मंजूर निधीचे बांधकाम यंत्रणा नगर परिषद असल्यामुळे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अडचण नाही.पण हेच कामे वर्ग करून pwd कडे केल्याने निधीचे हस्तांतरण होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

(बॉक्स)सार्वजनिक बांधकाम विभाग pwd अहवाल
:-नगर परिषद ला बांधकाम मंजूर निधी आहे,पण बांधकाम करण्यासाठी pwd ला वर्ग करण्यात आले आहे. यात मंजूर निधी pwd कडे हस्तांतरण झाले नाही. जोपर्यंत निधी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत बांधकामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार नाही.अशी माहिती विभागाने दिली आहे.

(बॉक्स ) नगर परिषद अंर्तगत मंजूर कामात जनप्रतिनिधीचे अडथळा दुर्देवी:– आमगाव नगर परिषद स्थापना करिता जनप्रतिनिधी यांची उदासीनतेमुळे आजही जनतेला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. तर शासनाने काही विकास निधी मंजूर करून दिलासा देण्याचा निर्णय योग्य आहे, पण जनप्रतिनिधी या विकास कामांचे स्वार्थ साधून राजकारण करीत असतील तर हे निषेधार्थ आहे.नागरिक याचे उत्तर देतील यात शंका नाही अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहे.