११ रेल्वेगाड्या दोन दिवस रद्द

0
12

नागपूर : तामिळनाडू राज्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला असून, या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वादळामुळे बुधवारी दक्षिण भारताकडून नागपूरला येणार्‍या आठ गाड्या येऊ शकल्या नाही. रेल्वे प्रशासनाने पुढील दोन दिवस या मार्गावरील तब्बल ११ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी १९ नोव्हेंबरच्या सात गाड्या आणि २0 नोव्हेंबरच्या चार गाड्या नागपूरला पोहोचणार नाहीत. यामध्ये १९ नोव्हेंबरच्या १६0३१ चेन्नई-कटरा अंदमान एक्स्प्रेस, १२६५६ चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस (व्हाया वर्धा), १२६१५ चेन्नई-दिल्ली जीटी एक्स्प्रेस, २२४0३ पाँडेचरी-दिल्ली एक्स्प्रेस, २२८१६ एर्नाकुलम-बिलासपूर एक्स्प्रेस, १२२९ पाटणा-बेंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस आणि १२६७0 छपरा-चेन्नई एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. २0 नोव्हेंबर रोजी न येणार्‍या गाड्यांमध्ये १७६४१ कन्याकुमारी-निजामुद्दीन तिरुकुरल एक्स्प्रेस, १२६८७ मदुराई-डेहराडून एक्स्प्रेस, १२६५२ निजामुद्दीन-मदुराई तामिळनाडू संपर्कक्रांती एक्स्प्रेस आणि १२६४४ निजामुद्दीन-त्रिवेंद्रम स्वर्णजयंती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.