; पहिले मतदान 19 एप्रिलला, शेवटचे 3 जूनला; 4 जून रोजी निकाल, आचारसंहिता लागू
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान 19 एप्रिलला पहिला तर 20 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?◾️
◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
नवी दिल्ली,दि.16- केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील १८ व्या लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन केली.देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही आज घोषित केल्या.महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रातील पुर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे.
मतदान तारीख
टप्पा 1: 19 April 2024- नॉर्थ इस्ट, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड
टप्पा 2: 26 April 2024-महाराष्ट्र,
टप्पा 3: 7 May 2024
टप्पा 4: 13 May 2024
टप्पा 5: 20 May 2024
टप्पा 6: 25 May 2024
टप्पा 7: 1 June 2024
लोकसभा आणि चार विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने ३.४ लाख केंद्रीय दलाची मागणी केली आहे. आयोग 97 कोटी मतदारांसाठी देशभरात सुमारे 12.5 लाख मतदान केंद्रे तयार करू शकतो. ८०० जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.देशात सध्याच्या घडीला ९७ कोटी नोंदणीकृत मतदार असल्याचे यावेळी राजीव कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे देशात साडेदहा लाख मतदार केंद्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये ५५ लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम, १.२ कोटी प्रथम मतदार, ४८ हजार तृतीयपंथी, १०० वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या २ लाख, १.५ कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार
फेज 1– अधिसूचना 28 मार्च रोजी प्रसिद्ध होईल. 30 मार्च आणि 19 एप्रिल रोजी विड्रॉल होणार आहे. बिहारमध्ये माघार घेण्याची शेवटची तारीख २ एप्रिल असेल. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत.
१६ जूनला १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली.
12 राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक
भारतीय निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष असते. यावर्षी जगभरात सर्वत्र निवडणुकांचे पर्व सुरू आहे. देशात एकूण ९७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.देशात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक EVM, 1.2 कोटी प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख , 1.5 कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचीही घोषणा:आंध्रच्या 175, ओडिशाच्या 147, अरुणाचलच्या 60, सिक्कीमच्या 32 जागांवर मतदान होणार
ओडिशातील 147, सिक्कीममधील 32, अरुणाचल प्रदेशातील 60 आणि आंध्र प्रदेशातील 175 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. ओडिशात बिजू जनता दल (बीजेडी) सत्तेत आहे. येथे भाजपची थेट स्पर्धा आहे. नवीन पटनायक 2000 पासून येथे मुख्यमंत्री आहेत.
YSR काँग्रेस पक्ष (YSRCP) नेते जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. येथे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी (टीडीपी), अभिनेता पवन कल्याणची जनसेना आणि भाजप युती एकत्र निवडणूक लढवत आहेत.
अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. 2019 मध्ये पक्षाने 60 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय सिक्कीममध्ये प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सरकार आहे. येथे युती सरकारमध्ये भाजपचा समावेश आहे.
आंध्र प्रदेश: वायएसआर काँग्रेस, टीडीपी आणि भाजप युतीमध्ये लढत
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागा आहेत. दोन्ही निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. राज्यात जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआरसीपीचे सरकार पाच वर्षांपासून सत्तेवर आहे. विरोधी पक्षाचे नेतृत्व चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पार्टी (टीडीपी) करत आहे. ते तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी, भाजप आणि जनता सेना पक्ष (जेएसपी) एकत्र निवडणूक लढवणार आहेत. जनसेना पक्ष 175 जागांपैकी 21 जागा लढवणार आहे. भाजप 10 तर टीडीपी 144 जागांवर निवडणूक लढवणार आहे. पिठापुरम जागेवर यावेळी कडवी लढत होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेते आणि जेएसपी प्रमुख पवन कल्याण आणि चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा या जागेवरून आमनेसामने येणार आहेत.
राज्यात भाजपची स्थिती : 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नाही. 2014 मध्ये भाजपने टीडीपीसोबत युती करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपने 3 खासदार आणि 9 आमदार जिंकले. टीडीपीने 2019 मध्ये भाजपशी संबंध तोडले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. टीडीपी तीन जागांवर खाली आली आणि भाजपला खातेही उघडता आले नाही.
ओडिशा : नवीन पटनायक सहाव्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी रिंगणात
ओडिशामध्ये लोकसभेच्या 21 आणि विधानसभेच्या 147 जागा आहेत. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली राज्यात बिजू जनता दलाचे (बीजेडी) सरकार आहे. नवीन पटनायक 5 मार्च 2000 पासून सतत मुख्यमंत्री आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते नेते ठरले आहेत. ते सलग २४ वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. आता त्यांच्या पुढे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग आहेत, ज्यांनी 24 वर्षे 166 दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
सिक्कीम: चामलिंग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले, सत्तेत परतण्याची प्रतीक्षा
सिक्कीममध्ये लोकसभेच्या 1 जागा आणि विधानसभेच्या 32 जागा आहेत. प्रेमसिंग तमांग उर्फ पीएस गोळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सरकार आहे. 1994 ते 2019 पर्यंत, राज्यावर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) ची सत्ता होती. पक्षाचे प्रमुख पवन चामलिंग 24 वर्षे 166 दिवस सतत मुख्यमंत्री राहिले. तथापि, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एसकेएमला 17 जागा मिळाल्या, तर चामलिंग यांच्या पक्षाला केवळ 15 जागा मिळाल्या.
भाजपला एकही जागा मिळाली नाही, पण एसडीएफचे 10 आमदार सामील झाले
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सिक्कीममध्ये भाजपला एकही जागा मिळाली नाही. 13 ऑगस्ट 2019 रोजी पवन चामलिंग यांच्या पक्ष SDF मधील 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशा स्थितीत एसडीएफकडे केवळ ५ आमदार उरले होते. राज्यात भाजप आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) यांची युती आहे.