‘बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करा’

0
19

नवी दिल्ली-येत्या २६ जानेवारीपूर्वी बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून मुंबई उच्च न्यायालय करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी लोकसभेत केली. केंद्र सरकारने नुकतीच विविध राज्यातील नावे बदलण्यास मंजुरी दिली आहे. शिवसेना-भाजपच्या १९९५ मधील युती सरकारच्या काळात बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे केले होते. तरीसुद्धा मुंबईतील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयाची नावे जुन्याच म्हणजे बॉम्बे नावाने सुरु आहेत. त्यापैकीच बॉम्बे हायकोर्ट हे एक आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत या मुद्द्याकडे लक्ष वेधून बॉम्बेच्या ऐवजी मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण केले जावे अशी मागणी केली.
बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलण्याची २००८ सालापासून लोकसभेत मागणी करण्यात येत असूनही आजवर दुर्लक्ष करण्यात आल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच विविध राज्यातील नावे बदलण्यास मंजुरी दिली. त्यानुसार राऊत यांनी ही मागणी केली.