भारतातील 6,483 जण जगभरातील तुरुंगात

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – जगभरातील भारतीयांबद्दल लोकसभेत माहिती देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे राष्ट्रीयत्व असलेले एकूण 6,483 लोक जगातील वेगवेगळ्या 68 देशांमध्ये तुरूंगवासात असून त्यापैकी सर्वाधिक 1,469 जण सौदी अरेबियाच्या ताब्यात असल्याची सांगितले.

याबाबत लोकसभेत माहिती देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढे म्हणाल्या की, 421 जण पाकिस्तानाच्या तुरुंगात असून भारताच्या शेजारील राष्ट्रांनी गेल्या वर्षभरात 151 भारतीय कैद्यांना मुक्त केले असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या उच्च आयोगाकडे असलेल्या माहितीप्रमाणे युद्धकैदी म्हणून 74 भारतीय पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. मात्र, या माहितीची अद्याप खात्री पटली नसल्याचेही त्या म्हणाल्या. भारताबाहेर शिक्षा भोगत असलेल्या 322 भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे. मात्र ते अद्यापही कैद्येतच असल्याचेही स्वराज यांनी सांगितले. त्यापैकी 276 पाकिस्तानच्या तुरुंगात, 43 जण बांगलादेशच्या तुरुंगात तर तीन जण बहारीनच्या तुरूंगात असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. याशिवाय 2013 मध्ये 6,683 भारतीय भारताबाहेर मृत झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच घरगुती कामासाठी किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी किंवा आरोग्य क्षेत्रातील सेवांसाठी 2013 साली 21,563 महिलांना भारताबाहेर काम करण्याची अनुमती देण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.