राजस्थानात गॅस टँकरच्या भीषण स्फोटात १० ठार

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बीलपूर- गावापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या महामार्गावर एका गॅस टँकरने पेट घेतल्याने झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली.
यावेळी महामार्गावरुन काही वाहने जात होती. त्या वाहनांनीही पेट घेतला. या अपघातात दहा जण होरपळून ठार झाले असून बारा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दक्षुल (वय ६), राधामोहन (वय ४०), विनोद (वय ३७) या तिघांची ओळख पटल्याचे जयपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितीन दीप यांनी सांगितले. जखमीपैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.