५२ अत्यावश्यक औषधी होणार स्वस्त

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – सरकारने अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ५२ नव्या औषधांना मूल्य नियंत्रण प्रणालीच्या कक्षेत आणले आहे. यात वेदनाशामक व अँटिबायोटिकचा समावेश आहे. याशिवाय कर्करोग व त्वचाविकारांच्या उपचारात उपयोगी पडणा-या काही औषधांचेही दर नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे.

यामुळे आता ४५० पेक्षा अधिक औषधी राष्ट्रीय औषधी मूल्य प्राधिकरण प्रणाली (पीसीएम) अंतर्गत आल्या आहेत. हे प्राधिकरण देशात अशा औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.

यांचा समावेश
पॅरासिटामॉल, ग्लुकोज, अ‍ॅमोक्सिसिलिन, डायझोपॅम, कोडिन फॉस्फेट, लोसार्टन, सिप्रोफ्लोक्सासिन आणि डायक्लोफेनेक, कर्करोग व त्वचाविकारांच्या औषधी स्वस्त होणार.