इस्त्रोच्या ‘जीएसएलव्ही मार्क-३’ चे यशस्वी प्रक्षेपण

0
13

नेल्लोर – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्त्रो) गुरुवारी अंतराळ क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. इस्त्रोच्या महत्त्वपूर्ण ‘जीएसएलव्ही मार्क-३’ प्रक्षेपकाचे गुरुवारी यशस्वी प्रक्षेपण झाले.राष्ट्रपती प्रणब मुखजीर्,पंतप्रधान नरेंद्र मोदी,सरक्षण मंत्री मनोहर परीर्कर यांनी सवार्चे अभिनंदन केले आहे.भारताने पुन्हा जागतिक पातळीवर आपले नाव कोरले आहे.
सकाळी साडे नऊ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून या प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. या नव्या महाकाय प्रक्षेपकामुळे भारताला तब्बल चार टनांपर्यंतचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे. याच प्रक्षेपकाच्या साहाय्याने भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल.
बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून याचे काऊंटडाऊन सुरु झाले होते. अखेर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. ‘मार्क ३’चे यशस्वी प्रक्षेपण इस्त्रोच्या भविष्यातील वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
१.५५ कोटी रुपये या मोहिमेसाठी खर्च करण्यात आले आहेत. या प्रक्षेपकाची चार हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.